पाथरी विधानसभेसाठी सोमवार रोजी सतरा नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया चालू असून सोमवार (दिनांक 28 ) रोजी एकूण 17 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.
आज सोमवार रोजी
सुरेश अंबादास वरपूडकर काँग्रेस, रंगनाथ मोहन सोळंके सोनपेठ अपक्ष , अर्जुन ज्ञानोबा भिसे कोल्हावाडी अपक्ष ,डॉ. राम अच्युतराव शिंदे कानसुर अपक्ष ,गोविंद मदन घांडगे मानवत अपक्ष, अरुण सितारामजी कोल्हे उमरा अपक्ष, माधवराव तुकाराम फड परभणी अपक्ष, गयाबाई माधवराव फड परभणी अपक्ष, बापूराव रावसाहेब कोल्हे उमरा अपक्ष, नितीन रामराव लोहट परभणी अपक्ष, नारायण तुकाराम चव्हाण पाथरगव्हाण खू. मराठवाडा मुक्ती मोर्चा ,निर्मलाताई उत्तमराव गवळी सोनपेठ राष्ट्रवादी काँग्रेस, सुरेश फड परभणी वंचित बहुजन आघाडी, दादासाहेब रामराव टेंगसे रेणापुर अपक्ष, जगदीश बालासाहेब शिंदे कानसूर अपक्ष ,सईद खान बिरबल खान पाथरी राष्ट्रीय समाज पक्ष , सचिन सुरेश निसर्गध वरखेड बीआरएसपी
या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत आता पर्यंत एकूण 26 उमेदवारानी 29 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत.आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त मंगळवार हा एक शेवटचा दिवस बाकी आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी दिली .