ताज्या घडामोडी

शेतकरी वर्गांची व जनतेची कामे जलद गतीने होण्यासाठी बल्लारपूरला नियमित पटवारी द्या!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तहसीलदारांकडे मागणी !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात ओद्यौगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर साजाला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नियमित तलाठी नाही. दरम्यान या साजाचा अतिरिक्त कार्यभार कळमनाचे तलाठी शंकर करलुके सांभाळत असून त्यांचे कडे आजच्या स्थितीत दोन साजाचा कार्यभार आहे. या दोन्ही हलक्याचा कार्यभार सांभाळतांना त्यांना अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे.तदवतंच जनतेची कामे ‌वेळेवर होत नाही. स्थानिक बल्लारपूरचा तलाठी निलंबित झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलल्या जाते. बल्लारपूर येथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभारी तलाठी करलुके सक्षम नाही.असे जनतेचे म्हणणे आहे. जनतेची फेरफार संबंधित व अन्य बरीच कामे या तलाठी दप्तर मध्ये खोळंबलेली आहेत. साधे उत्पन्नाचे दाखले मिळवण्याकरिता दोन ते तीन दिवस तलाठ्याची वाट बघावी लागते असे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे.या शिवाय वारंवार शेतक-यांसह जनतेला तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे . त्यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहेत.या साजाला नियमित तलाठी मिळावा यासाठी बल्हारपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुमित (गोलू) डोहणे, आदिवासी सेलचे बल्लारपूर अध्यक्ष भाग्यवान मेश्राम, अंकीत निवलकर, बबलू पठाण, सौंदर्य ढोके आदींनी याची दखल घेत तलाठी कार्यालय बल्लारपूर येथे नियमित तलाठी देऊन जनतेची कामे मार्गी लावण्यात यावी अशी मागणी नायब तहसीलदार सतीश साळवे यांना एका निवेदनातुन आज केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close