येत्या 31मे ला कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार तुलसिदास कोवे होतात सेवानिवृत्त

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे चिमूरचे नायब तहसिलदार तुलसिदास वासुदेव कोवे वयोमानानुसार येत्या 31मे ला 36 वर्ष 6महिणे सेवा करुन सेवेतून सेवानिवृत्त होत आहे.त्यांचे मुळ गांव भद्रावती तालुक्यातील सिताराम पेठ असून ग्रामीण भागात राहणाऱ्या या अधिकाऱ्यांने आपले शिक्षण बारावी पर्यंत पूर्ण केले .सन 1985 मध्ये ते महसूल विभागात आले आणि त्यांनी भद्रावती तालुक्यातील आरंभी चालबर्डी रै.तलाठी साजाचा कार्यभार सांभाळला.नंतर ( काही वर्षांनी) त्यांनी वरोरा तालुक्यातील चारगांव धरण या पटवारी दप्तरचा कार्यभार स्विकारला.तलाठी म्हणून काम करीत असताना त्यांना सन 2003 मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली.मंडळ अधिकारी म्हणून त्यांनी नंदोरी मंडळाचा सर्व प्रथम कार्यभार सांभाळला . नंदोरीत काही वर्ष काम केल्या नंतर त्यांचे स्थानांतर भद्रावती तालुक्यात आदर्श ग्राम म्हणून ओळखलेल्या जाणा-या चंदनखेडा या गावी झाले . तलाठी ते मंडळ अधिकारी असे पद सांभाळल्यानंतर त्यांना परत एकदा सन 2012ला नायब तहसिलदार होण्याची (पदोन्नती होण्याची) संधी मिळाली.वरोरा येथे नायब तहसिलदारचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांचा ख-या अर्थाने तालुक्यातील राजकीय पुढाऱी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व जनतेंशी अधिकचा संबंध आला .नायब तहसिलदार हे महत्वाचे पद सांभाळताना त्यांनी नियमात बसून जनतेची कामे कमी वेळात अधिक कशी करता येईल यावर अधिक भर दिला.बघता बघता त्यांनी आपल्या कामाने अधिकारी वर्गां सोबतच जनतेचा अल्पकालावधीत विश्वास संपादन केला.शासकीय वसूली नैसर्गिक आपत्ती, अवैध गौण खनिजांवर दंडात्मक कारवाई करणे ,निवडणूक सारखी महत्वांची कामे कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सहकार्यांने व त्यांना विश्वासात घेवून तेवढ्याच जबाबदारीने पार पाडली.त्यांच्या उल्लेखनिय कामाबद्दल अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक देखिल केले .महसूल विभागातील प्रत्येक टेबल वरील त्यांचा कामांचा अनुभव दांडगा असल्यामुळे त्यांना शक्यतो आपल्या शासकीय कामकाजात अडचण निर्माण झाली नाही.वेळ प्रसंगी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही घेतले .ही सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतांनाच त्यांनी काही काळ वरोरा व चिमूर येथील प्रभारी तहसिलदार म्हणून कार्यभार सांभाळला .तदवतचं चिमूर तालुक्यातील नवनिर्मित भिसी नगर पंचायत प्रशासक म्हणून त्यांनी तेवढ्याच जबाबदारी त्यांनी काम पाहिले.अतिशय शांत स्वभावी असणारे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करणारे कोवे यांनी जनतेसोबतच कर्मचारी वर्गांशी सदैव आपुलकीचे व सहानुभूती चे संबंध ठेवल्यामुळे सहजरित्या जनतेची व कार्यालयातील कामे वेळीच पूर्ण करुन त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.त्यांची कामे करण्याची जी जुणी शैली होती. तिच शेवट पर्यंत त्यांनी कायम ठेवली.मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषेवर देखिल त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते.एका सर्व सामान्य कुटुंबातील असलेले कोवे यांनी कधीच आपल्या पदाचा रुबाबदारपणा दाखविला नाही.जनतेची कामे कशी तातडीने पूर्ण होतील या कडे त्यांनी (शासकीय सेवेत) सर्वाधिक लक्ष वेधले होते.तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त येणारा कुठलाही व्यक्ती नायब तहसिलदार कोवे यांची भेट घेऊन सर्व प्रथम त्यांचा सल्ला घेतात .हे चिमूर तालुक्यात आज पावेतो अनेकांनी बघितले आहे.त्यांनी आपल्या एवढ्या वर्षांच्या सेवेत एसडीओ अविनाश कातडे, प्रमोद भुसारी,जनार्दन लोंढे ,संतोष कुमार ,कुंदनकुमार सोनवने , सुधाकर कुडमेथे ,अनंत वालस्कर, आदींच्या सहवासात काम केले. महसूल विभागातून सेवानिवृत्त होत असलेले तुलसिदास कोवे यांचे कार्य नवोदित कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी असेच आहे.