नेरी येथील डॉक्टर मृणालिनी नागदेवते यांची आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधनासाठी निवड

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील नेरी येथील डॉक्टर मृणालिनी नागदेवते यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ मधून पी. एच.डी. केमिस्ट्री या विषयात पदवी घेऊन icar रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथून त्यांची चिल्ड्रन मर्सी हॉस्पिटल मेन्स सिटी न्यूयॉर्क अमेरिका येथे निवड झालेली आहे. डॉक्टर मृणालिनी नागदेवते या येथील रहिवासी आतिष ईश्वर नागदेवते यांची अर्धांगिनी नसून अतिष नागदेवते हे केंद्रीय राखीव पोलीस दल दिल्ली येथे सेवेत कार्यरत आहेत. त्या icar research पुणे येथे कार्यरत होत्या. त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर या आजारावर पाच पेपर प्रकाशित केले. त्यांची ब्रेस्ट कॅन्सर अत्याधुनिक संशोधनासाठी चिल्ड्रेन मर्सी कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट कॅन्सर सिटी अमेरिका येथे निवड झाली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर सुभाष पाध्ये, डॉक्टर खुर्शिद अहमद, डॉक्टर खान यांना दिलेले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक त्यांचे परिवार व सर्व स्तरातून होत आहे.