अडेगाव येथे मोहरी पिकाच्या बियाणांचे वाटप संपन्न

कृषी विज्ञानकेंद्र सिंदेवाही व तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न.
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
नेरी वरून जवळ असलेल्या अडेगाव (को) येथे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व तालुका कृषी अधिकारी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि 10 डिसें ला मोहरी पिकांच्या बियाणांचे वाटप करण्यात येऊन पीक पद्धती बदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अडेगाव (को) येथे मोहरी बियाणे वाटप कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व तालुका कृषी अधिकारी चिमूर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोहरी पिकबद्दल माहिती देण्यात येऊन पीक कश्या पद्धतीने घ्यायची आणि लागवड कशी करायची याबद्दल माहिती देण्यात आली सदर पीक रब्बी हंगामात का घेतल्या जाते आणि पिकाचे महत्व यावर चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ सिडाम तसेच कृषी अधिकारी डी ए तिखे मंडळ कृषी अधिकारी शेंडे साहेब बी टी एस यांनी केले या मोहरी वाटप कार्यक्रमाला कन्नके सर कृषी सहायक अमित रंधये तेजपाल येसनकर गणेश उमाटे प्रमुख म्हणून उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी अडेगाव येथील सरपंच मनोहर चौधरी उपसरपंच रामचंद्र झोडे प्रेमानंद बनसोड दीपक झोडे शंकर कोसे ताराचंद बोरकर अरविंद कोसे पोलीकराम झोडे हिरामण गेडाम देवानंद झोडे वीनायक झोडे बालाजी झोडे जगदिश झोडे तुकाराम भाकरे कैलास झोडे कपील कोसे हिरामण कापगते सुधाकर नाकाडे निलकंठ गेडाम गजानन आळे ,शेखर हाडेकर बळीराम नागपुरे सुभास मसराम उपस्थित होते.