ताज्या घडामोडी

सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांची वाण नाही तर दान या उपक्रमातून मुलीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे माजी सभापती जि.प.परभणी यांच्या वतीने वाण नाही तर दान या उपक्रमातून इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या कु.रुख्मिन दत्तात्रय उगले या मुलीला शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत

प्रतिनिधी:- अहमद अन्सारी परभणी

मागील 9 वर्षा पासून अविरतपणे सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे वाण नाहीतर दान हा उपक्रम राबवतात. हळव्या स्वभावाच्या प्रेमळ लोकनेत्या मीराताईचा दांडगा जनसंपर्क आहे. जेवढ्या कणखर पणे त्या निर्णय घेतात तेवढ्याच त्या हळव्या हि आहेत. एक वेळेस टीव्ही वर बातमी पाहत असतांना एका आत्म्हत्याग्रस्त कुटुंबाची बातमी दाखवत होते. ते पाहून त्या खूप दुखी झाल्या. फक्त दुखी होऊन थांबल्या नाहीत तर. कोणी आत्महत्याच करणार नाही यासाठी त्या विचार करू लागल्या आपल्या संस्कृती प्रमाणे अनेक महिला संक्राती सणाला महिलांना वान म्हणून हजारो रुपये खर्च करतात. पण सौ.मीराताई टेंगसे यांना हे मान्य नाही. त्यांनी वान वर होणारा खर्च आपल्या आसपास असलेल्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे म्हणजेच १८ अस्या शालेय मुलांचे शैक्षणिक खर्च तब्बल प्रती विध्यार्थी ४ हजार प्रमाणे ७२००० रुपये ची वान देऊन संक्रांति सण साजरा केला. हे फक्त एकाच वर्षासाठी नसून आज पावोत त्या वाणावरील खर्च टाळून त्या गरजू व गोर-गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याची वाटप करतात.
राजकारणासोबतच समाजकार्याची जाणीव असणाऱ्या माजी कृषी,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सभापती सौ.मीराताई टेंगसे यांनी जिल्हा परिषद एवढेच सांभाळले नाहीतर अनेक समाज कार्य हि केले आहेत. जसे पाथरी तालुक्यातील मराठा मुलांसाठी चालू केलेल्या अभ्यासिकेसाठी त्यांनी मदत केली.एका गरीब कुटुंबातील मुलगी जि आपला शैक्षणिक खर्च धुनी-भांडी करून पूर्ण करत होती. तिला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून तिचा शैक्षणिक साहित्य व खाजगी शिकवणी साठी मदत केली. पाथरी येथील स्टेट बँक ऑफ कृषी शाखा पाथरी समोर शेतकरी उपोषण सुरू असतांना मरडसगाव येथील शेतकरी आत्माराम काळे यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले होते कर्ता पुरुष गेल्यामुळे मुलांचे शिक्षण थांबणार होते अश्या परिस्थितीत सौ. टेंगसे देवदूता सारखे उभे राहिल्या. त्यांचे दोन्ही लेकरांची फक्त सांत्वन न करता त्यांचे लेकरांचे सर्व शैक्षणिक खर्च उचलले. आज पर्यंत हे कार्य सुरू आहे. मागील वर्षीहि जागतिक महिला दिनानिमित्त गरीब कष्टकर्यांची मुलगी बोरगव्हान,देवगाव येथील प्रत्येकी एका विद्यार्थीनीला मदत दिली आहे.या वर्षीही सिमुरगव्हान येथील कु.रुख्मिन दत्तात्रय उगले इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला आज शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली. या वेळी सौ.सत्यभामा घेवारे,राधाताई टेकाळे,शिवकण्या पौळ,सोमनाथ डोंगरे ,नरसिंग रोंगे,शिवलिंग देवडे,ज्ञानेश्वर निपाणिकर,कालिदास राऊत,विलास चव्हाण व मुलीच्या आई व भाऊ उपस्थित होते.
वृक्ष वली आम्हा सोयरे, वनचरे ! या प्रमाणे त्यांनी रेणापूर येथे आपल्या शेतात व परिसरात वेगवेगळी वृक्ष लावून त्यांची जोपासना हि स्वतः करत असतात. सौ.टेंगसे यांनी ज्ञानेश्वर नगर देवनांद्रा पाथरी येथील सर्व महिलांना एकत्र करून वटसावित्री पौर्णिमा या दिवशी फक्त वडाची पूजा न करता त्या दिवशी ज्ञानेश्वर नगर भागात वडाची वृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली अशी वेगवेगळी सामाजिक कार्य त्या सतत करत असतात.जि.प.परभणी सभापती पदी सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांची निवड झाली व त्यांना कृषी ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय हे खाते मिळाली होते. या खात्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताची कामे केली आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची शेती अवजारे,शेतकरी मेळावे,पशुप्रदर्शन,लसीकरण मोहीम कृषी प्रदर्शन अश्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा केली.लम्पि स्किन डिसीज हा महाभयंकर आजाराने शेतकरी परेशान असतांना सर्कल वाईज लसीकरण शिबीर घेऊन महिला फक्त घरातील लेकरे व घर सांभाळण्यासाठी नसून देश,राज्य हि सांभाळू शकतात.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close