लमाण तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत संत सेवालाल, संत केदारेश्वर ग्रामविकास पॅनलची मतदारांमध्ये चर्चा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यातील अनेक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक रणधुमाळी परळी तालुक्यातील लमाण तांडा येथील संत सेवालाल व संत केदारेश्वर ग्राम विकास पॅनलची मतदारांमध्ये चर्चा रंगत आहे. सरपंच पदाच्या उमेदवार सौ. पार्वतीबाई प्रभाकर राठोड, यांच्या नावाची सरपंच पदाची चर्चा मतदारांमध्ये दिसून येत आहे. तसेच या पॅनलच्या सर्व उमेदवारांची मतदारांमध्ये चर्चा दिसून येत आहे . तसेच प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे. वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सौ.लिंबाबाई आप्पाराव राठोड , सौ.शांताबाई दत्तू चव्हाण,सौ. रेणुकाबाई किशन जाधव,वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार सौ. कमलबाई विठ्ठल राठोड, सौ. अनिल भगवान राठोड,वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार सौ. अनुसयाबाई गणपत पवार,वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार राजेभाऊ मधुकर भांगे,सौ.कल्पना प्रल्हाद सावंत,सौ. गंगाबाई भास्कर गीते या तिन्ही वार्डांचे उमेदवार व सरपंच पदाचे उमेदवार यांना लमाण तांड्यामध्ये मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच , प्रचारामध्ये संत सेवालाल संत केदारेश्वर ग्राम विकास पॅनल यांनी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या लमाण तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत दिसत आहे.