पाथरी येथे श्रीराम नवमी उत्सवाची उत्साहात सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16..4.2024 वार मंगळवार
पहाटे 5:30 ला साईबाबांची काकड आरती झाली, त्यानंतर श्रींचे मंगल स्नान व त्यानंतर संजय भुसारी विश्वस्त यांचे शुभ हस्ते श्रींची पाद्यपूजा झाली शिर्डी माझे पंढरपूर आरती झाली
सकाळी 6ला मंदिरातून द्वारकामाईकडे मिरवणुकीचे टाळ व मृदुंग वादनात प्रस्थान झाले. मिरवणुकीत संस्थांचे अध्यक्ष आर्किटेक श्री सुभाष दळी तसेच संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड अतुल चौधरी यांनी श्रींची प्रतिमा घेतली संस्थांचे कोषाध्यक्ष सूर्यभान सांगडे यांनी विणा तर विश्वस्त श्री संजय भुसारी यांनी साई चरित्र ग्रंथ घेतला. द्वारकामाईत संजय भुसारी यांचे शुभहस्ते साई चरित्र ग्रंथाचे पूजन झाले संस्थांचे पुजारी योगेश इनामदार वाळुंजकर शास्त्री यांनी पौरोहित्य केले संजय भुसारी विश्वस्त यांनी साई चरित्र प्रथम अध्यायाचे श्रद्धापूर्वक वाचन केले. मिरवणुकीत नामांकित मृदुंगाचार्य सुरेश अब्दल संत सुधाकर बेद्रे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण कुलकर्णी , श्री सागर पातूरकर ,सौ शिवकन्या नागठाणे,सौ. गीता पाटील पाटोदकर श्री प्रभाकर पाटील सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका कमलबाई तेलंगे तसेच इतर साई भक्तांनी सहभाग घेतला. सकाळी आठ वाजता सूर्यभानजी सांगडे कोषाध्यक्ष विश्वस्त यांचे शुभ श्रींना महाभिषेक करण्यात आला. दुपारी 12.30 वाजता मध्यान्ह आरती व महाप्रसाद झाला.

दुपारी 3.30 वाजता श्री ह भ प प्रभाकरराव आजेगावकर महाराज पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. मंदिराचे शिखरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली.
सायंकाळी 06.30 वाजता धूप आरती झाली, त्यानंतर श्रींच्या पालखीची मिरवणूक आणि हरिपाठ पार पडला. रात्री नऊ वाजता श्रींची शेजारती झाली.