ऐरोली (ठाणे) येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे यश
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ऐरोली येथे दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत महाराष्ट्र बॉक्स लंगडी संघाच्या 12 वर्षा आतील मुले व मुली तसेच खुला गट पुरुष व महिला अशा चारही संघांनी प्रथम क्रमांक जिंकला या स्पर्धेत महाराष्ट्र बॉक्स लंगडी 12 वर्षा आतील मुलांच्या संघात जि. प.कें. प्रा.शा. चे दोन विद्यार्थी अथर्व घांडगे व प्रथमेश भुमरे खुला गट पुरुष गटात शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वालुर येथील विकास राठोड, शांताबाई नखाते विद्यालय कसापुरी येथील विद्यार्थी अभिषेक घांडगे आणि खुला गट महिला गटातून शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी येथील कु.श्वेता शिंदे, कु.धनश्री चौरे, कु.ऋतुजा काळे अशा तीन विद्यार्थिनींनी प्रतिनिधित्व केले विजयी खेळाडूंचा परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असो.चे जिल्हा अध्यक्ष अजिंक्यभैया नखाते यांनी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे सत्कार केला याप्रसंगी प्राचार्य डहाळे के .एन, तुकाराम शेळके सर, असोसिएशनचे सचिव भरत घांडगे महाराष्ट्र बॉक्स लंगडी संघाचे कोच रामा शहाणे या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.