ताज्या घडामोडी

माळी समाज नेरी तेेर्फे सावित्रीआई फुले जयंती उत्सव संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी : कैलास भोयर

माळी समाज नेरी च्या वतीने सावित्रीआई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमानिमित्त माळी समाजाचा परिसर रांगोळी व पताकांनी सजला होता.पुरुष, महिला व बालक विशेष पोषाखात वावरत होते या कार्यक्रमात भाषण स्पर्धा व गायन स्पर्धा आयोजित केली होती होते.समाजातील अनेक युवक युवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून समाज बांधवांकडून वाहवा मिळाली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संजयभाऊ डोंगरे विशेष अतिथी म्हणून राजुरवाडे मँडम प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री रामदास सहारे माजी सरपंच,प्रभाकर लोथे सर,पांडुरंग मेश्राम सर, विजय कडुकार, वसंता कामडी,कु.दिक्षा चौधरी व कु.श्वेता सहारे उपस्थित होते या कार्यक्रमात राजूरवाडे मॅडम नि स्त्री शिक्षण व समाजातील स्त्रियांचे स्थान यावर मार्गदर्शन केले तर संजय डोंगरे साहेबानी माळी समाजातील शैक्षणिक प्रगती यावर भाष्य केले मोट्या उत्साहात कार्यक्रम महाप्रसाद नी पार पडला या कार्यक्रमाचे संचालन नितेश कामडी सर प्रास्ताविक प्रभाकर लोथे सर आभार भारत राऊत कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न अंकित कामडी, सुमित लांजेवार, सौरभ सहारे, शंकर सहारे, स्वप्ननिल बारस्कर,प्रणाल कामडी, खिमदेव चौधरी, अक्षय कामडी,निखिल कामडी व सोनाली कामडी यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close