ताज्या घडामोडी

देवगाव (रं) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद़्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

देवगाव (रं) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद़्घाटन मा. अतुल भाऊ खूपसे पाटील जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते
दि. 11 एप्रिल रोजी पार पडले वरिष्ठ पदाधिकारी मा. उमाकांत तिडके पा.( प्रदेश. कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य),श्री. बाबाराजे कोळेकर,(पश्चिम महाराष्ट्र प्र.) श्री. ह.भ. प .अण्णा महाराज पवार(मराठवाडा अध्यक्ष) श्री. साै.वनिता बर्फ (नवी मुंबई अध्यक्ष) श्री. शर्मिला नलावडे (प .म.अ. भीमा कोरेगांव) श्री. संतोष कोळगे पा. (युवा जि. अध्यक्ष ),श्री. प्रभाकर भुसारे बापु (का. आ. नेते),श्री.संतोष साळुंके (तालुका अध्यक्ष कन्नड),श्री.सांडू सुरे(कामगार आघाडी ता. अध्यक्ष),श्री.संतोष सोनवणे (युवा ता. अध्यक्ष),श्री. दिनेश राजपूत (उप तालुका अध्यक्ष) श्री.राणा वाघमारे, ई मान्यवरांच्या उपस्थितीत
जिल्हा कार्य अध्यक्ष श्री .अनिल शेळके पाटील
यांच्या मार्गदर्शनाणे कन्नड तालुक्यात विविध गावात जनशक्ती संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या करीम नगर सानिया नगर कन्नड,ब्राह्मणी, चिमनापूर,मक्रणनपुर,वासडी, शिवराई, हसनखेडा ई.
या कार्यक्रमाची सुरुवात कन्नड तालुक्यातील देवगाव
(रं) येथून करण्यात आली या प्रसंगी देवगाव रं.येथे जाहीर सभा ठेवण्यात आली होती.
क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले
यांची जयंती असल्याने महात्मा फुलेच्या प्रतिमेस मा. अतुल खूपसे पाटील संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पूजन करून मा. अतुल खूपसे पाटील यांच्या हस्ते तसेच कन्नड तालुक्यातील पदाधिकारी व महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्या उपस्थित शाखेच्या पाटीचे उदघाटन पार पडले .तसेच
देवगाव रंगारीत शाखेच्या वेगवेगळ्या नीयुक्त्या देण्यात आल्या त्यात श्री. संतोष सोनवणे (तालुका अध्यक्ष),श्री. गोकुळ हिवाळे (सोशल मीडिया ता .अ.) श्री. संजय चौथरे (सर्कल प्रमुख), श्री. दत्तु (काका) रावते (शहर प्रमुख), श्री. अमोल सोनवणे (उपशहर प्रमुख) श्री.भगवान तांगडे ( शहर कार्याध्यक्ष),श्री. समीर शेख (सचिव),श्री. शिवाजी शिरसेे (कार्याध्यक्ष) श्री.सचिन पवार (सचिव) श्री. अमोल काळे (सहसचिव),श्री. काकासाहेब आंभोरे (सहसल्लागार),
श्री. चेतन सोनवणे पा. (शाखा प्रमुख ),श्री.सुनील शिरसे
(उपशाखा प्रमुख), श्री. मोहन चौथरे (कोषाध्यक्ष),योगेश डोळस (संघटक) तसेच सदस्य साठी श्री.रूपचंद कांबळे, श्री. आकाश सोनवणे, श्री. शिरीष गोरे,श्री. संदीप बडोगे, श्री. अमोल जाधव, श्री. अमोल चौथरे,श्री. लक्ष्मण देसाई, श्री. गणेश गोरे, श्री. अशोक गवळी,श्री. गोविंदा गवळी,श्री. सचिन रोकडे,श्री. महेश सोनवणे,श्री.खंडू सोनवणे, श्री. दिलीप चौथरे, श्री. कार्तिक शहाणे ,इरफान पठाण ई. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगाव (रं) पत्रकार कमलाकर चौधरी यांनी केले .या प्रसंगी वरिष्ठ पदाधिकारी यांच स्वागत शाल पुष्पहार देऊन करण्यात आला या प्रसंगी अतुल खूपसे पाटील यांच स्वागत माजी. प. स. सदस्य .श्री. गोकुळ गोरे यांनी केल या प्रसंगी मा अतुल खूपसे पा संस्थापक अध्यक्ष यांनी बोलतानी सांगितले की संघटनेचा उद्देश काय,संघटना शेतकरी तसेच कामगार यांसाठी संघटना कशा प्रकारे भूमिका घेते त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगातुन आपण काहीतरी चांगले विचार घेतले पाहिजे ज्या मुळे सामाजिक विचारसरणी बदलेल आपल्या परखड भाषांतून प्रबोधन पर भाषण केले.यानंतर वनिता ताई बर्फ यांनी संघटनेचे आंदोलन विषयी माहिती दिली
याप्रसंगी गावातील काही प्रतिष्ठीत शेतकरी महिला कामगार आणि गावच्या सरपंच साै.कांता ताई गोकुळ गोरे सरपंच देवगाव रंगारी, श्री.ललित सूरासे (ग्रा.प.स),श्री.प्रदीप दिवेकर (ग्रा. प. स),सोमीनाथ बर बंडे, (ग्रा प स),श्री. कलीम मनीयार (ग्रा प स),माजिद मुल्ला (ग्रा प स),शिवराय येथून आलेले महिला कार्यकर्ते
शेवटी काका साहेब आंभोरे यांनी देवगाव रंगारी शाखेच्या वतीने आभार मानले तसेच देवगाव रंगारी पोलीस निरीक्षक श्री.अमोल मोरे साहेब यांच्या सहकार्याने
आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमांने हा कार्यक्रम पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close