महीला डॉक्टरांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

शहर प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा तिरोडा शहरात नावाजलेले दंत रोग तज्ञ असलेल्या महीला डॉक्टर ने स्वत राहत असलेल्या किरायाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 4मार्च ला उघडकीस आली आहे
वॄत असे की गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील वीर सावरकर वार्ट येथे किरायाच्या घरी राहत होती. डाॅक्टर नेहा पारधी वय 26 वर्ष असे मॄतक डॉक्टर चे नाव असून ती मुळची तिरोडा तालुक्यातील सेज गाव येथील रहिवासी आहे नेहा ने आत्महत्या का केली ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन क्लिनिक मध्ये पेशंट येऊन गर्दी करत असताना डॉक्टर ने नेहा का क्लिनिक मध्ये आली नाही हे बघण्यासाठी हॉस्पिटल चे कर्मचारी गेले असता ती किरायाने राहत असलेल्या घरी गेल्यावर संबंधित घटना उघड झाली आहे ह्याची माहिती घर मालकाने तिरोडा पोलीसांना दिली असून पोलीस घटना स्थळी पोहोचताच पंचनामा सुरू करुन डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालय येथे उतरीय तपासणी साठी पाठवुन डॉ नेहा ने आत्महत्या का केल्याचा तपास तिरोडा पोलीस करीत आहे.