सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील सुपरिचित युवा कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवंते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या ६ नोव्हेंबर २०२३ ला त्यांचा वाढदिवस चंदनखेडा मुक्कामी थाटात साजरा होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रीडा मंडळ व मित्र परिवारातील सदस्य अमित नन्नावरे, मंगेश नन्नावरे, मनोहर हनवते, स्वप्निल कुळसंगे, मंगेश हनवते,राहुल चौधरी, शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, महेश केदार,रोशन मानकर, नंदकिशोर जांभुळे, गणेश हनवते, पुरुषोत्तम चौखे,कुणाल ढोक,भुपेश निमजे,सौरभ बगडे, राहुल दडमल, शंकर दडमल, राकेश सोनुले , संदिप चौधरी, प्रफुल्ल ठावरी, प्रज्वल बोढे,प्रविण भरडे, पंकज दडमल, दिनेश दोडके, अविनाश नन्नावरे, संतोष गायकवाड, स्वप्निल चौके, विजय खडसंग,अनिल हनवते, देवानंद दोडके,प्रणित हनवंते, देविदास चौखे,दिलिप ठावरी,आशिष हनवंते, यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सोमवारला सकाळी ७ वाजता राजमाता माणिका पेणठाणा पुजन, सकाळी ७.३० वाजता पेणठाणा परिसरात श्रमदानातून स्वच्छता, व वृक्षारोपण कार्यक्रम, सकाळी ११ वा. गुरुदेव सेवा मंडळ चंदनखेडा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवंते यांच्या हस्ते होत आहे.कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नागोराव ठावरी विभूषित करणार आहे.◾सदहु कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून मारोती गायकवाड नथुजी बोबडे, श्रीराम सोनुले, उत्तमराव झाडे, महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे सदस्य अभियंता किशोर निखार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.◾याच कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जगदिश देवगीरकर लाभणार आहे.भारतीय पोस्ट अपघाती योजने बाबत ते या कार्यक्रमात माहिती देणार आहे .
◾सायंकाळी ७ वाजता आदिवासी सामुहिक नुत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन रविंद्र श्रीनिवास शिंदे यांचे हस्ते होणार आहे.
सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वेता भोयर ,आशा नन्नावरे, योगिता बोढे, व मनोहर हनवते, उपस्थित राहणार आहे.