कृषी विद्यार्थिनींनीकडून राबवण्यात आला ‘ बीज गोळयांचा ‘ उपक्रम

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न ,महारोगी सेवा समिती ,आनंदवन द्वारा संचालित , आनंद निकेतन कृषि महावि्द्यालय , आनंदवन , वरोरा येथे कृषी शिक्षण घेत असलेले विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत मजरा येथे कृषी संजीवनी सप्ताह दरम्यान येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला . या उपक्रमात कृषी विद्यार्थिनींनी गावातील चिमुकल्यांना बीज गोळे बनविण्याचे धडे दिले व त्यांचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले.
सीड बॉल्स’ ही निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना आहे. यात माती, शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. विद्यार्थिनींनी त्यात जांभूळ, बोर, आवळा,चिंच, बेल, आंबा अशा देशी झाडांच्या बिया वापरून बीज गोरे तयार करण्यात आले. हे सीड बॉल्स पावसाळयात पर्यावरणासाठी पोषक ठरतात.
कृषी विद्यार्थिनींनी या बीजगोळ यांचे वाटप शेतकरयांना करण्यात आले, व त्याचे महत्व समजावून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार , डॉ. रामचंद्र महाजन, (प्रमुख,ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम ), डॉ. स्वप्नील पंचभाई, (समन्वयक,ग्रामीण कृषि कार्यानभव कार्यक्रम), डॉ. प्रदीप अकोटकर यांच्या मार्गदरशनाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात कु. प्रिया ताजने, कु. आचल तेलासे, कु. लीना ठाकुर या विद्यार्थीनीनी सहभाग घेतला.