मानवत येथील अखतर शाह खुनाचा तपास सि.आय.डि कडे द्या
मयतचे नातेवाईक व महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाणची मागणी.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथील अखतर जलील शाह या युवकांची मानवत तालुक्यातील बोरगाव शिवारात निर्घुन पणे हत्या करण्यात आली होती या घटनेस तब्बल अडिच वर्ष होत आहे यातील आरोपी अजुनहि मोकाट फिरत आहे पोलीसांना या गुन्हयांचा छडा लावण्यात अद्याप हि यश आले नसुन या प्रकरणाचा तपास सि.आय.डि कडे देण्याची मागणी मयतच्या कुटुंबियांनी व महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण यांनी दि.४ आँगस्ट रोजी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नांदेड व मा.पोलीस अधिक्षक साहेब परभणी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तकिया मोहल्ला मानवत येथील अखतर जलील शाह याचा दि.६ फेब्रुवारी २०२० रोजी ताडबोरगाव शिवारात कच्चा रस्त्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता अखतर शाह यांचा खुन करण्यात आला अशी फिर्याद त्यांचा भाऊ तन्वीर जलील शाह यांनी ६ फेब्रुवारी २०२० रोजी दिली असता मानवत पोलीस ठाण्यात गु.र.नं००१८ / २०२० भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून अद्याप पर्यंत गुन्हे अन्वेशन शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय परभणी यांनी कार्यवाही केलेली नाहि कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी आरोपींना अटक करुन त्वरीत कार्यवाही करण्यासाठी दि.६ फेब्रुवारी २०२० दि.१८ मे २०२० दि.२३ जानेवारी २०२१ पोलीस अधिक्षक परभणी, पोलीस निरीक्षक मानवत ,अध्यक्ष मानवाधिकार आयोग मुंबई यांना निवेदन देऊन दि.२३ जानेवारी २०२१ रोजी मानवत पोलीस स्टेशन समोर अखतर शाह यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी अमरण उपोषण हि केलेले आहे तरी हि अद्याप पर्यत आरोपी गुन्हेगाराचा शोध घेवुन गुन्हे अन्वेशन शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय परभणी यांनी अटक केलेली नाहि ही बाब शाह कुटुंबांवर अन्याय कारक आहे तरी या प्रकरणाचा सि.आय.डि कडुन तपास करुन यातील गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण चे प्रदेश संघटक अहेमद अन्सारी, प्रदेश महासचीव शेख अजहर हादगावकर,तालुकाध्यक्ष जिलानी जलील शाह,तन्वीर शाह यांच्या स्वाक्षरी आहे.