पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक साठी 415 मतदान केंद्रांची निर्मिती

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाथरी विधानसभा मतदार संघात एकूण 415 मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहरी भागात 70 मतदान केंद्र असून ग्रामीण भागातील 345 मतदान केंद्रांचा समावेश आहे . त्यात तालुकानिहाय मतदान केंद्र पाथरी तालुका 122 मतदान केंद्र, मानवत तालुका 105 मतदान केंद्र, सोनपेठ तालुक्यातील 83 मतदान केंद्र, व परभणी ग्रामीण 106 मतदान केंद्रांचा समावेश आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक 25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्रमांक 1 शेवडी तालुका मानवत या एका केंद्रास संवेदनशील केंद्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. शहरी भागातील एकूण 73 मतदान केंद्र ही पर्दानशीन मतदान केंद्र म्हणून घोषित केले आहे. त्यात पाथरी येथील 20 मतदान केंद्र, मानवत 15 केंद्र, सोनपेठ10 केन्द्र व परभणी ग्रामीण 28 मतदान केंद्रांचा समावेश आहे या मतदान केंद्रांवर किमान एक महिला कर्मचारी ची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार. पाथ्री विधानसभा मतदारसंघात मतदारांचे संख्या पुरुष मतदार 2 लाख 1 हजार 8 शे 24 स्त्री 1 लाख 88 हजार 7 शे 21 तृतीय पंथी दोन एकूणमतदार 3 लाख 90 हजार 5 शे 47 अशी नोंदझालेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी दिली
त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत, श्री शंकर हांदेशवार तहसीलदार पाथरी, श्री महाजन नायब तहसीलदार पाथरी इत्यादी निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे.
निवडणूक कार्यक्रम. कालावधी
1.निवडणूक अधिसूचना जारी करणे. 22 ऑक्टोबर 2024
2.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख. 29 ऑक्टोबर 2024
- नामनिर्देशनपत्रची छाननी. 30 ऑक्टोबर 2024
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024
- मतदानाचा दिनांक. 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणीचा दिनांक. 23 नोव्हेंबर 2024