पंतप्रधान मुख्यमंञी खासदार आमदारांचं ही कंत्राटीकरण करा – खासदार संजय जाधव यांचा सवाल

जिल्हा प्रतिनिधीः अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र शासनाने देखील इथून पुढे नोकर भरती ही खाजगी कंपन्या नेमणूक कंत्राटी स्वरूपाची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युवकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. हाच आक्रोश परभणी शहरातील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून व्यक्त केला. सरकारने तात्काळ हा काढलेला शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली असून शासन निर्णयाची होळी करत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला. हे घेराव आंदोलन शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

खाजगीकरण करायचेच असेल तर पंतप्रधान पदाच्या खुर्ची पासून राष्ट्रपती ची खुर्ची असो की मुख्यमंत्र्यांची या सर्वांचेच खाजगीकरण करण्यात यावे. आपल्या खुर्च्या मात्र ठेवायचे आणि सर्वसामान्यांच्या नोकरीचे खाजगीकरण करायचे हे आता सर्वसामान्यांना समजले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर हा काढलेला शासन निर्णय वापस घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले.
