ताज्या घडामोडी

प्रेरणा वरपुडकरांच्या वाढदिवसा निमित्त शाळेच्या मुलींना सायकल वाटप

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,परभणी च्या संचालिका प्रेरणा वरपुडकर यांच्या वाढदिवसा निमित्त मुलींना शिक्षणा साठी सोयीचे व्हावे या साठी वाढदिवसाचा सकल्प म्हणून प्रेरणा वरपुडकर यांच्या कडून वाघाळा येथील जिल्हापरिषद शाळेत नियमित येजा करणा-या ईय्यता१०च्या मुलींना शनिवार २५ मार्च रोजी वाघाळा जिल्हा परीषद प्रशाळा शाळेत एका कार्यक्रमात सायकलींचे वाटप करण्यात आले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमा साठी सरपंच बंटी पाटील,शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष सुशिल घुंबरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ थोरे,युवक काँग्रेसचे डॉ महेश कोल्हे,माजी जिल्हा परीषद सदस्य माणिक आप्पा घुंबरे,विजय कुमार घुंबरे,डि बी मोकाशे,चव्हाण मॅडम,मुजीब शेख,यु जी स्वामी,सचिन वाघ,हनुमान घुंबरे,अशोक उर्फ पिंटू घुंबरे,पदमाकर मोकाशे,बी एस वाघमारे,सुदामआप्पा घुंबरे,पत्रकार किरण घुंबरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी वाघाळा जिल्हापरिषदेच्या शाळेत नियमितपणे ये जा करणा-या फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्ती वरील इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थीनींना सौ प्रेरणा वरपुडकर यांच्या वतीने ९ सायकली देण्यात आल्या त्यात अनुसया शाम काळे,कोमल लक्ष्मण पवार,वर्षा मुंजा जावळे,सुमन शंकर पवार,दिपाली पंडीत पवार,पल्लवी बंडू काळे,पुजा माणिक काळे,नंदिनी विजय सहजराव,पुनम गौतम पुंडगे,जना विठ्ठल पवार यांचा सामावेश आहे.
या वेळी बोलतांना त्यांनी १० वी परिक्षर्थींना शुभेच्छा देत मुलींची लक्षणिय संख्या असल्याने समाधान व्यक्त करत दहावी परिक्षेत सर्वाधिक गुण घेणा-या मुलींना योग्य ते बक्षिस देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा केली. मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे या साठी मी वाढदिवसी संकल्प केला असून या सायकलींचे वाटप म्हणजे याच संकल्पाचा एक भाग असुन आपण नियमित सामाजिक कार्यात वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. या वेळी शालेय व्यवस्थापण समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने लाभधारक मुलींच्या हस्ते प्रेरणाताई वरपुडकर यांच्या वाढदिवसाचा केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
तत्पर्वी त्यांनी मृत्युंजय श्री वाघेश्वराचे दर्शन घेतले. या देवस्थान साठी लवकरच भव्य असे सभागृह आ सुरेशराव वरपुडकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत देणार असल्याचा पुन्हा एकवार सांगून. वाघाळा फुलारवाडी या साडे तीन किमी अंतराच्या रस्त्या साठी डिपीडीसी मध्ये तरतुद करण्या साठी प्रयत्न करेल असे आश्वासन वाघाळा ग्रामस्थांना दिले.
या वेळी वाघाळा ग्रामस्थ,जि प चे सर्व शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सचिन वाघ यांनी केले तर आभार हनुमान घुंबरे यांनीआभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close