ताज्या घडामोडी

दैनिक लोकांकीत च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राला आजही तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजकारण राजकारण प्रशासन आणि सर्वच एकंदरीत व्यवस्था व्यवस्थित करण्याचे काम वर्तमानपत्र मिडिया करत असते. प्रशासनाला सुतासारखं सरळ करणार भ्रष्टाचाराला जॉब करणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आणि गोर गरीब शोषित पीडितांना न्याय देणारे मुंबई मधील प्रसिद्ध वर्तमानपत्र संपादक संजय पवार यांचे दैनिक लोकांकीत च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथील प्रसिद्ध हॉटेल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक २९ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी सबंध महाराष्ट्र मधून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, अभिनय, सांस्कृतिक, मीडिया या सर्व क्षेत्रातील अग्रगण्य अशा व्यक्तींना राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.
दैनिक लोकांकीत च्या सहाव्या वर्धापनिनानिमित्त पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला समाजातील सर्वच स्तरातील लोकांची हाजेरी होती. दैनिक लोकांकीत वर प्रेम करणारे वाचक, नेते आणि अभिनेते यावेळी उपस्थित होते. यामध्ये म्हाडा चे संचालक विश्वास कोळी, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता अमोल भावे, लग्नाची बेडी फेम सिधेश प्रभाकर, अलबत्या गलबत्या फेम श्रद्धा हांडे, मुरंबाफेम अमोल सावंत,विरोधी पक्षनेते पनवेल महानगर पालिका प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी बीड चे युवानेते डॉ.बाबुजोगदंड, लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार मयूर तांबडे इत्यादी मान्यवर मंडळी उपसथित होती. तर यावेळी समाजातील विविध स्तरातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आले यामध्ये बीड येथील ज्येष्ठ समाजसुधारक भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, राजकीय व्यक्तिमत्व असूनही समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देणारे डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉक्टर बाबु जोगदंड, रुग्णांना रात्री-अपरात्री ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे, मोफत मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरे, विद्यार्थी शेतकरी खेळाडू डॉक्टर अशा सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी न्याय देणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर, बालाघाट परिसरात मूर्ती छोटी कीर्ति महान अशा पद्धतीचे सामाजिक बोलले असणारे समाजाप्रती नेहमीच तत्पर सेवा भाव असणारे गोरगरिबांचे नेतृत्व विवेक बाबा कुचेकर बीडच्या या चार रत्नांना यावेळी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मयूर तांबडे, पत्रकार राजभण्डारी, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण पाषाण, गणपत वा रगडा, राजकीय व्यक्तिमत्व तसेच विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रितम म्हात्रे या व अश्या अनेक मान्यवरांना यावेळी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला तर काहींना जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई आणि गुजरात येथील हिऱ्यांचे व्यापारी तसेच स्वखर्चातून गोरगरिबांची शस्त्रक्रिया मोफत करणारे, स्त्रियांनी शिकलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे अशी भावना असणारे आणि श्री शिक्षणासाठी स्वखर्चातून कॉलेज काढून मोफत शिक्षण देणारे उद्योजक शेठ नानाजिभाई खिमजी भाई ठानावाला हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक लोकमत कि चे सर्वेसर्वा मुख्य संपादक माननीय संजय पवार यांनी केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नॅशनल मेडिकल असोसिएशन दिल्ली च्या कोळी मॅडम,म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे संचालक सन्माननीय विश्वास कोळी, अभिनेता अमोल सावंत, दिग्दर्शक आणि निर्माता अमोल भावे, अभिनेत्री श्रद्धा हांडे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मनोरंजनासाठी रंग महाल हा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शेवटी स्नेहभोजन आणि काही विशिष्ट लोकांना गिफ्ट देऊन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी दैनिक लोकांकीत चे संपादक संजय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य वाचक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी दैनिक लोकांकीत च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close