प्रियंका गायकवाड यांचे केले अनेकांनी अभिनंदन

प्रथिनिधीःरामचंद्र कामडी
भद्रावती तालुक्यातील शेगांव खूर्द येथील मुळ रहिवाशी कु.प्रियंका गायकवाड यांना नुकताच या वर्षि मूल पत्रकार भवनात राष्ट्रीय लोकहित सेवाचा सन्मान पुरस्कार बहाल झाल्या बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय भद्रावतीच्या रजनी रणदिवे, नागपूरच्या नयना झाडे, मुंबईच्या श्रूति उरणकर, वणीच्या सुपरिचित कवयित्री रजनी पोयाम, हैद्राबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी, चंद्रपूरच्या कवयित्री सीमा पाटील, रिना तेलंग, सोनाली इटनकर, पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कवयित्री कु.अर्चना सुतार, श्रुति शेंडे, कर्ज मुक्ती अभियानाच्या गिता मेहर, चिमूरच्या साहित्यिक वर्षा शेंडे, कोठारीच्या वर्षा कोंगरे, मूलच्या कवयित्री स्मिता बांडगे, सामाजिक महिला कार्यकर्त्या मुग्धा खांडे, तनूजा रायपूरे, पथ्रोटच्या पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक विजया भांगे आदिंनी गायकवाड यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १२कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन या वर्षि प्रथमच लोकहित सेवा तर्फे सन्मान करण्यात आला होता.त्यात गायकवाड यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे.