लंबडपल्ली येते स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या निधीतून नाली बांधकामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा तालुक्यातील 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लंबडपल्ली गावात अनेक वर्षांपासून नाल्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यातील पाणी गावात साठून येण्या जाण्यास मोठी अडचण होत आहे,
त्या पाण्यातून लंबडपल्ली तील लोकांना अनेक रोगांची वातावरण निर्माण होत आहे,
या समस्येची स्थानिक लंबडपल्ली येथील नेत्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या कडे मागणी केली असता ,मागणीची दाखल घेऊन धर्मराव बाबा आत्राम साहेब यांनी त्यांचे स्थानिक आमदार निधीतून लंबडपल्ली येते माजी जिल्हा परिषद अध्यक्षा – भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत पेंटीपाका ग्राम पंचायत सरपंच – रेड्डी बालक्का यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिरोंचा पंचायत समिती सदस्य – जंपन्ना दुर्गम , राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष – मधुकर कोल्लूरी,कार्यकर्ते – देवा येनगंदूला ,रामुलू पागे,बापू कोंडागुर्ला, नरेश कडर्ला, गौतम वेंकटेश्वराव, वेंकटी कज्जम,बापू दुर्गम, सारय्या मूलकला, आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.