ताज्या घडामोडी
मानवत येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अन्सारी अहमद परभणी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ सप्टेंबर रविवार रोजी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त
सुमनांजली निवासी मूकबधिर विद्यालय मानवत येथे मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे आणि शालेय साहित्याचे वाटप करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सचिव विलास भाऊ पतंगे,
मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, उपाध्यक्ष रमेश केंदळे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे, कार्याध्यक्ष ओमकार वाघमारे, युवा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, चर्मकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.