ताज्या घडामोडी

आमडी (बेगडे) येथे “सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण” शुभारंभ कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चिमूर तालुक्यातीलआमडी येथील श्री हनुमान मंदिर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण शुभारंभ कार्यक्रम दिनांक 30/09/2023 शनिवार ला सकाळी ठीक 9.15 ते 11.00 या कालावधीत संपन्न झाला.
खडसंगी येथे झालेल्या ‘100 व्या शनिवार” ला श्री हनुमान चालीसा महोत्सव येथे मा.आ.श्री. किर्तिकुमारजी भांगडीया यांनी चालीसा मंडळ ला संकल्पना वेक्ती केली की, 151 व्या शनिवार पर्यंत आपण “51 गावात” श्री हनुमान चालीसा पठण सुरु करायचे. या कार्याचा सर्वांच्या उपस्थित संकल्प घेत आमडी या गावापासून शुभारंभ सुरुवात करायची घोषणा सर्वानुमते झाली.
आमडी येथील या मंगल प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प.जीवन महाराज थेरे ( श्री हनुमान सेवा प्रचारक – जिल्हा चंद्रपूर), राजूपाटील झाडे ( मा.प.सं. सभापती), रमेश कंचलवार, राकेश कामडी विशेष उपस्थिती होते.
या कार्यक्रमा करिता खडसंगी येथील श्री हनुमान चालीसा पठन टीम प्रामुख्याने उपस्थित होती. सर्व प्रथम श्री हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयघोष करून चालीसेला सुरुवात करण्यात आली. त्या नंतर ह.भ.प श्री जीवन महाराज थेरे यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच रमेशम कंचलवार हे करीत असलेल्या सेवा कार्याचा परिचय देत त्यांचा सत्कार राजूपाटील झाडे यांनी स्वतः केला. त्या नंतर त्यांनी चालिसेचे महत्व सांगत मार्गदर्शन केले. बंडूजी भलमे, दादाजी पांडे, मुकेश गिरी यांनी सुद्धा शुभेच्या देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प श्री जीवन महाराज थेरे यांनी या मंगल प्रसंगी मार्गदर्शन करत सांगितले की, प्रत्येक गावात श्री हनुमान चालिसा पठन झाल पाहिजे. यातून समाजातील वेक्ती हे सद्गुनी व निर्वेसणी होतील व मानव कल्याण होईल, ही भावना वेक्त केली. त्या नंतर आरती व प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यात गावातील कल्पनाताई धोटे( सरपंच आमडी), नंदु हिवरकर (उपसरपंच आमडी), मुकेश गिरी (पोलिस पाटील आमडी), डिमेश गाठे, बंडूजी भलमे, अरुण रणदिवे, शंकरजी दांडेकर, यशवंत पांडे, नामदेव जिकार, ज्ञानेश्वर वाघ, संजय बाबरे, विठ्ठलजी तिमांडे, मोरेश्वर डंभारे, अरुण बगणे, श्रीकांत माहुरे, सुधाकर गंधारे, उत्तम आवळे, शुभम डरे, मंथन भलमे, अविनाश गाठे, शंकर गाठे, नंदकिशोर चंदणखेडे, दादाजी पांडे, सचिन रणदिवे, विश्वनाथ गोरवे, संजय गोरवे, योगेश गाठे, बंडूजी वाकळे, देविदास गराठे, प्रकाश डरे, खेमराज इसणकर, दुर्गा डरे, शीतल गोरवे तसेच गावातील बाल-गोपाल, तरुण मंडळी व जेष्ठ बंधू, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close