अखिल महा. प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिमुर चे प्रलंबित समस्या करिता बेमुद्दत साखळी उपोषण

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
अखिल महा प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिमुर च्या वतीने दिनांक 28/12/2021 पासून प्रलंबित समस्या करिता बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे..कालपासून जवळपास 100 संघ सैनिक उपस्थित होते.
आंदोलनाची सुरवात प्रथम दिवसाचे अध्यक्ष महोदय उपस्थित मान. श्री. मनोहर महाकाळकर सर यांच्या हस्ते आदरणीय आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करून केले.

साखळी आंदोलनाचे प्रास्ताविक तथा सर्व समस्येचा सार तालुका शाखा सरचिटणीस ओमेश जांभुळे , सतिश डोंगरे सर व पांडुरंग भोरे सर यांनी मांडले..
मागील 6 महिन्यापासून अनेक प्रलंबित समस्येवर मनोगत आदरणीय सर्व श्री. भोयर सर, संगमवार सर, खानोरकर मॅडम, योगेश पावसे सर, राऊत सर लोथे सर, भुसारी मॅडम, मनोज मानकर सर तथा तालुकाध्यक्ष श्री. केळझरकर सर व इतर संघ सैनिक यांनी मांडले….
पहिल्या दिवसापासून उपोषणाचे नियोजन संघ सैनिक श्री. दंडारे सर, श्री. सुशील मसराम, चिडे सर, श्री डुकरे सर, शेंडे सर, बगडे सर, कुबडे सर, , केंद्रे सर, वैद्य सर, पिसे सर, पराते सर, सातपुते सर, भिसे सर, शिरभय्ये सर, गिरडे सर, महाजन सर, सावरकर सर चांदेकर सर, निकोसे सर नन्नावरे सर, करमकर मॅडम, वरघने मॅडम, बावनकर मॅडम, पिसे मॅडम, कामडी मॅडम, बोकारे मॅडम व हेमलता बारमासे, यांनी केले.
इतर सर्व उपस्थित संघ सैनिक यांनी उपोषण सफल होण्यास मदत केली.
समस्या निकाली निघत नाही तो पर्यंत संघ सैनिक ठाण मांडून बसणार आहे.