अतिवृष्टीत वाहून गेलेले रस्ते व पुलाबाबत आमदार गुट्टे यांनी घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक

मतदार संघातील क्षतिग्रस्त रस्ते विकास कामाकरिता लागणारा १००ते १५० कोटी रुपयांचा निधी वेळप्रसंगी शासनाकडून भांडून आणावा लागेल. – आ.गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेलेले रस्ते व पुलांच्या नुकसानी बाबतीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. नागरिकांना चांगले रस्ते देण्याची माझ्यासह आपली सुद्धा जबाबदारी असल्याचे अधिकाऱ्यांना बजावून सांगितले. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मी जेलमध्ये असताना सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांची सेवा करण्यातच मी माझे आयुष्य खर्ची करणार आसून येथील जनतेकरिता मी काहीही करण्यास तयार आहे. क्षतिग्रस्त रस्ते व पुलांच्या विकास कामाकरिता लागणारा १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी वेळप्रसंगी शासनाशी भांडण करून आणावा लागला तरी मी मागेपुढे पाहणार नसल्याचे आमदार गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
या बैठकीस जि.प. सदस्य किशनराव भोसले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गंगाखेड श्री सोनवणे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग गंगाखेड उपअभियंता श्री डेबेटवार, जिल्हा परिषद बांधकाम विभाग पूर्णा उप अभियंता श्री बांगर,सीएमजीएसवाय उप अभियंता श्री बेंबाळकर, यांच्यासह या विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.