ताज्या घडामोडी
स्व. दागोजी पिसे महाविद्यालय नेरी येथे वृक्षारोपण करुन केला गणराज्य दिन साजरा

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
नेरी येथील स्व.दागोजी पिसे महाविद्यालय येथे गणराज्य दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक श्री सुरेश दा.पिसे सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन नागदेवते सर व प्रणव सुरेश पिसे सर हे होते.
झेंडावंदन झाल्या नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या शितल ध. शिवरकर , प्राध्यापिका पल्लवी कामडी , गौरी नेऊलकर , रागिणी डांगे , चेतन बंडे व विद्यार्थी उपस्थित होते.