एकरा येथे वन कर्मचा-यांची कार्यशाळा

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
ब्रम्हपुरी वन विभागातील, एकारा विश्राम गृह परिसरा मध्ये आज दि.२३.३.२०२१ रोजी का्र्यशाळा घेण्यात आली, येथे ब्रमहपूरी वन विभागातील, उत्तर ब्रम्हपूरी, दक्षिण ब्रम्हपूरी वन परिक्षेत्रातील, अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते,
वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दररोज वनात खडतर सेवा करावी लागते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनात नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो.
व्यक्तीमत्व विकास व ताण-तणावाचे व्यवस्थापन यां माध्यमातून एकारा येथे आज ता. 23 मार्च 2021 एक दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेला वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपूरी कु. पी. एच. ब्राम्हणे, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण ब्रम्हपुरी कु.एल. एस. शहा, व श्री.जयेश देशमुख, मोटिवेशन स्पिकर , नागपूर उपस्थीत होते तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कु.शाह मँडम यांनी अध्यक्षीय भाषना मधुन ताणतणाव बाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा वन विभागात दैनंदिन कार्य करताना कर्मचाऱ्यांवर येणारा ताण शिवाय जंगल भागात काम करताना जाणवणारा त्रास यातून अनेकदा जीवन कठीण होत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे, यातून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी ताण-तणाव व्यवस्थापनासंबंधी कर्मचाऱ्यांना चंद्रपुर वन प्रबोधनी मार्फत श्री.खडसे, भा.व.से. संचालक, श्री.प्रशांत खाडे, अपर संचालक यांचे मार्गदर्शनात वन विभागा मध्ये सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे,
श्री जयेश देशमुख,मोटिवेशन स्पीकर , नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी वागणे, बोलणे, व्यायाम, योग या माध्यमातून तणाव कसे कमी करायचे, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देशमुख यांनी धकाधकिचे जिवनात मानसिक तणावग्रस्त कर्मचाऱ्यांनी भूतकाळ आणि भविष्य काळातील गोष्टींवर भर न देत वर्तमानात जगणे शिकले पाहिजे असे सांगून नाते संबंधात दुरावा निर्माण होणारी परिस्थिती उत्पन्न न होऊ देण्याचा सल्ला, तसेच काळानुसार अपडेट राहणे बाबत यावेळी उपस्थित वनविभातील कर्मचाऱ्यांना दिला.कौटुंबिक नातेसंबध आणि अधिकाऱ्यांशी नाते कसे असावे,याविषयी श्री.जयेश देशमुख , मोटिवेशन स्पिकर यांनी उपस्थितांचे सखोल मार्गदर्शन केले, या वेळी श्री.महानंद वाकडे, प्रशिक्षण सहाय्यक, चंद्रपूर वन प्रबोधिनी, व चमु तसेच श्री.सय्यद, क्षेत्र सहाय्यक एकारा श्री.मडावी , वनरक्षक व वनमजुर यांनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची कामगिरी केली.