मानवत येथे कराटे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पो.उप निरीक्षक नारायण घोरपडे बिड जमादार शेख मुन्नु यांच्या हस्ते बेल्टचे वितरण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरात अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली गालिब नगर येथे मास्टर असिर खान हे गेल्या काही वर्षांपासून कराटे क्लास घेत आहे.
या क्लास मध्ये पन्नास विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी गालिब नगर येथील कुरेशी मंगल कार्यालय येथे
विद्यार्थ्यांची कराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धांमध्ये उत्तीर्ण येणाऱ्या विद्यार्थ्यांना यलो ऑरेंज ग्रीन बेल्ट व प्रमाणपत्र मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे, बीड जमादार शेख मुन्नू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बशीर भाई गुत्तेदार सेलुवाले होते प्रमुख उपस्थिती मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे, बीड जमादार शेख मुन्नू, हाजी रफिक कुरेशी मास्टर बालाजी शिंदे, मास्टर सुरेश देवर्षी, मोहम्मद सिद्दीक बागवान, शेख कदिर, शेख खिजर , रफिक कुरेशी, फारुख कुरेशी, उद्योजक नसिर बेलदार यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमांमध्ये बीड जमादार शेख मुन्नु यांनी आपले मनोगत व्यक्त केले म्हणाले की फक्त खेळ म्हणून न पाहता कराटे खेळ यांचे प्रशिक्षण स्वयं रक्षणाकरिता घेतल्या जाते आणि या खेळाचे विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, व आपण ही विविध स्पर्धा मध्यें सहभाग नोंदवा व मानवत चा नाव पुढे महाराष्ट्र मध्ये गाजवावे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन असिर मास्टर यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.