जांभुळघाट येथे राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघाची शाखा गठीत

अध्यक्ष पदी कपिला चावरे यांची निवड
भिसी प्रतिनिधी : विलास दिघोरे
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणनेत ओबीसी चा काँलम निर्माण व्हावा व ओबीसी समाजाची चळवळ तयार करण्यासाठी जांभुळघाट येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा ग़ठीत करण्यात आली. ओबीसी समाजाला संविधानीक अधिकार मिळावा. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी महिला सक्षमिकरणाची गरज आहे या हेतूने शाखा गठित करण्यात आली
राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ शाखा जांभुळघाट
च्या अध्यक्ष पदी कपिला चावरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी कविता ठाकरे,यांची निवड करण्यात आली. सचिव पदी आशा साठोने यांची निवड करण्यात आली. सहसचिव पदी अंजनाबाई मेश्राम कार्याध्यक्ष पदी बबिता वसाके यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष पदी वंदना कामडी यांची निवड करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजाननराव अगडे तालुका अध्यक्ष , श्री रामदास कामडी, श्री पानसे सर, कवडू लोहकरे, अक्षय लांजेवार, सौ यमुना कामडी उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याचे अभिनंदन करण्यात आले.