ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाथरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. 3/1 /2022 सोमवार रोजी पाथरी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध उपासिका मंदोदरी बाई फंड यांच्या निवास्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष महणुन मा. नारायण पैठणे भारतीय बौद्ध महासभेचे सोनपेठ पालकमंत्री हे उपस्थित होते.

उदघाटकः माझी तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे मा. शिवराज कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून मा.वामन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व आयु एस जी कांबळे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरी सोनपेठ चे पालकमंत्री एन के पैठने संघटक वामनराव साळवे तसेच महिला अध्यक्षा सुशीलाताई मनेरे महिला सचिव इंदुताई वाकडे महिला सचिव मुक्ताताई डोंगरे पोलीस मित्र मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई मनेरे तसेच लताबाई साळवे रेणुका सावळे मंदाताई साळवे शिलाबाई गायकवाड विजयमाला गायकवाड सुमनबाई साळवे इत्यादी उपासक-उपासिका उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुक्ताताई डोंगरे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालनः व आभार प्रदर्शन सौ.रेखाताई मनेरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य राजेश फंड यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close