ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी नेरी बंदचा एकमताने निर्णय

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा बंद ला सहकार्य करण्यासाठी तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे दिनांक 11 सप्टेंबर 2023 पासून व श्री विजयराव बल्की ,प्रेमानंद जोगी दिनांक 22 सप्टेंबर 2023 पासून अन्नत्याग आंदोलन करत असून सरकारकडून अजून पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी नेरी बंदचे आव्हान सर्वानुमते करण्यात आलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जात न्याय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के कॉलरशिप लागू करण्यात यावी, 52 टक्के ओबीसी समाजाला 52 टक्के आरक्षण देण्यात यावे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने लाभलेली 50% आरक्षण ची मर्यादा रद्द करण्यात यावी, महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेली वस्तीगृह त्वरीत सुरू करण्यात यावी, इत्यादी अनेक मागण्यांसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2023 ला नेरी बंदचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ नेरी यांनी केलेले आहे.