बल्लारपुर-चांदाफोर्ट – नागभीड – गोंदिया मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या सुरु

नागभीड येथे जबलपुर सुपरफास्ट गाडीचा थांबा मंजुर.
खास.अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश.
भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी मानले आभार.
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
कोरोना काळात देशभरातील सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या पण बल्लारपुर- चांदाफोर्ट- नागभीड- गोंदिया या मार्गावरील अपवाद वगळता पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.याची दखल घेत गडचिरोली चे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या नेतृत्वात दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २ ॲागस्ट २०२२ ला नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात केंद्रीय रेल्वे मंत्री नाम.अश्विन वैद्यजी व रेल्वे राज्य मंत्री नाम. रावसाहेब दानवे यांना याबाबत निवेदन दिले होते . त्यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती दिलेल्या आश्वासनानुसार १ ॲाक्टोबर पासुन या मार्गावरील सर्वच रेल्वे पॅसेंजर गाड्या पुर्वीप्रमाणेच नियमितपणे सुरु झाल्याने प्रवासी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.यासोबतच नागभीड रेल्वे स्थानकावर या मार्गावर नव्यानेच सुरु झालेल्या जबलपुर- चांदाफोर्ट या सुपरफास्ट रेल्वे गाडीचा थांबा मंजुर करण्यात आला आहे. याबाबत प्रवासी व नागरिकांच्या वतीने भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी रेल्वेमंत्री नाम. अश्विनी वैष्णवजी , रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे व गडचिरोली चे खासदार अशोकभाऊ नेते यांचे आभार मानले आहे.पण अजुनही पॅसेंजर गाड्यांचे प्रवासी भाडे हे एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये असंतोष आहे. वेळेची बचत होत असली तरीही आर्थिक ताण कमी न झाल्याने लवकरात लवकर पुर्ववत पॅसेंजर रेल्वे गाडीचे भाडे आकारण्यात यावे व प्रवाशांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी संजय गजपुरे यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.