ताज्या घडामोडी

अमर जवान शहीद अजय उरकुडे यांच्या स्मृती स्थानकाचे अनावरण खा. अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

अमर जवान शहीद अजय उरकुडे यांच्या स्मृती स्थळाचे अनावरण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.गडचिरोली येथील कॅम्प एरियातील अमर जवान शहीद अजय उरकुडे यांच्या स्मृती स्थळाचे अनावरण सोहळा दि.४ मार्च २०२४ ला सोमवारी खा.अशोक नेते यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे प्रमुखअतिथी म्हणून वीरमाता श्रीमती शांताबाई उरकुडे,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, हेमंतजी जंबेवार, अविनाश पाल, डी.डी. सोनटक्के सर,खोबरेजी,अजय बर्लावार, प्रकाश नंदनवार,श्रीमती सिंधुताई गिरडकर,वीजय उरकुडे,स्व.वीर अजय उरकुडे काॅन्व्हेंटचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी,उरकुडे परिवारातील सर्व सदस्य तथा बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

अशोक नेते यांनी बोलतांना गडचिरोली जिल्हयाचे सुपूत्र अजय उरकुडे सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करत असतांना त्यांना वीर मरण आले. विर जवान खर्‍या अर्थाने देशसेवा करत आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी बलिदान देणार्‍या शहीद जवानां प्रती आदर व्यक्त करतो.आज जे हे वीर जवान शहीद अजय उरकुडे स्मारक उभारण्यात आले.हे स्मारक गडचिरोली तील तरुणांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी‌ केले.याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी स्मारकाच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली.उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close