नेरीत दसरा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साह संपन्न

अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा यावर्षी कायम
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील नेरी येथे दसरा सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने 24 ऑक्टोंबर 2023 रोज मंगळवारला साजरा करण्यात आला. सायंकाळी दसरा समितीतर्फे नेरी येथील शंकरजी देवस्थान समोरील रावण मैदानावर रावणाच्या प्रतिकृतीचे जय श्रीरामाच्या घोषात दहन करण्यात आले.

दरम्यान सकाळपासून नेरीत उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले. दसऱ्यानिमित्त संपूर्ण बाजारपेठ फुलल्या होत्या. बाजारात फुल, हार व फळांची विक्री मोठ्या जोमात होती. आपले वाहन स्वच्छ करण्यासाठी गॅरेजमध्ये वाहन चालकांची गर्दी जमली होती. अनेकांनी घरोघरी शस्त्र स्वच्छ करून पूजा केली.

शंकरजी देवस्थान मंदिराच्या जवळ असलेल्या रावण दहन मैदानात रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभा करण्यात आला होता. राम ,लक्ष्मण, हनुमान बनलेल्या मुलांनी अग्निबाणाचा वर्षाव करत रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले .संपूर्ण परिसर यावेळी जय श्रीराम च्या “जय घोषाने” दणाणून गेला बच्चे कंपनीने आपल्या पालकांसह हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोनेरुपी आपट्याची पाने एकमेकांना देत नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.