ताज्या घडामोडी

फुले नगराकडे नेरी ग्राम पंचायतचे दुर्लक्ष

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

फुले नगर वार्ड क्र. ४ नेरी मधील ग्राम पंचायत अतंर्गत सन २०१९/२० मधील अनुसुचित जाती , नैवबौद्ध घटक वरती विकास योजने अंतर्गत बंद गटार नाली बांधकाम देवानंद कऱ्हाडे ते ज्ञानेश्वर नागदेवते यांच्या घरापर्यंत करण्यात आले आहे. परंतु त्याच नालीच्या पाण्याची विल्हेवाट करायला पाहीजे होती पण तसे करण्यात आले नाही त्या नालीचे संपुर्ण पाणी पुर्ण रस्त्यावरुन वाहत असते त्यामुळे फुले वार्डातील लोकांना जान्या येन्यासाठी अडथडा निर्माण झाला आहे. आणी रोडवर पाणी साचुन राहत असल्यामुळे व पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंगु , मलेरीया , हत्तीपाय यासारख्या आजारांचा धोका फुले वार्डातील लोकांना निर्माण झाला आहे. याबद्दल तिन महिन्या आधी ग्राम पंचायत नेरी ला रोडवरील पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी असे निवेदन देवुनही आत्ता पर्यंत रोडवरील पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही . ग्राम पंचायत नेरी फुले वार्डाकडे जाणुन लक्ष देत नाही असा आरोप वार्डातील लोकांनी प्रतिनिधीशी बोलतांना केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close