ताज्या घडामोडी

विविध नागरीकांचा चिमुर तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

आज क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्रात चिमुर क्रांती म्हणून ओळख असनारे शहर चिमुर येथे किल्यावर शहीद बालाजी रायपुरकर यांच्या पुतळ्याची साफसफाई करत यांना मानवंदना करुन पुष्पमाला अर्पण केली, राज्य मंत्री बच्चू कडु यांच्या आदेशानुसार प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाची सभासद नोंदणी करुन शेकडो नागरीकांनी प्रहार मध्ये प्रवेश केला आहे, शेरखान पठाण यांनी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत या परीसरातील अनेक दिव्यांग अपंग, शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांच्ये देखील त्वरीत प्रश्न सोडविले आहे, काग- नंदारा या रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रडखले आहेत नवेगाव पुनर्वसन या गावचे सुद्धा काही प्रश्न आनी अपंग बांधव या सर्वांचे प्रश्न तहसीलदार चिमुर यांच्याशी चर्चा करत ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी विनंती केली आहे, त्याच प्रमाणे भिसी-चिमुर हा या परीसरातील नागपूर ला जाण्यासाठी मुख्य मार्ग असुन गेल्या काही वर्षीपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत या करीता तहसीलदार मार्फत कलेक्टर साहेब चंद्रपूर यांना सदर निवेदन सुद्धा दिले या मार्गाची त्वरीत दखल न घेतल्यास आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला, या वेळी उपस्थित शेरखान पठाण, विनोद ऊमरे, प्रहार वाहुन चालक संघटनेचे प्रविन वाघे, सचिन वाघे, अनील भोयर, किशोर डांगे, सुनील सुकारे अक्षय कामडी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close