ताज्या घडामोडी

आरोग्यसेवा दाता डॉ.जितीन वंजारे सच्चे समाजसेवक – रशिद शेख

डॉ. जितीन वंजारे यांचा खालापूरी येथे सत्कार संपन्न – रशिद शेख

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

खालापूरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जीतीन दादा वंजारे खालापुरीकर यांची सामाजिक कारकीर्द पाहता वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अनमोल आहे. खालापूरीसह परिसरात ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांना मनोभावे वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर हे सच्चे समाजसेवक आहेत. असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका संघटक व खालापूरी गावचे तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष रशिद शेख उर्फ मामू यांनी केले.
गावातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करणारे तसेच गावात उच्च पदस्थ असणाऱ्या सर्व मंडळींची प्रोत्साहनपर सत्कार समारंभ आयोजीत करून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन ईतर विद्यार्थ्यांना मिळवून देणारे डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापुरीकर हे एक सच्चा समाजसेवक आहेत. कोरोना सारख्या महामारी मध्ये रुग्णांची मनोभावे सेवा त्यांनी केली,घर प्रपंच, संसार आणि समाज या सर्वांचा ताळमेळ घालून राजकारण, समाजकारण व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करून बीडच्या सामाजिक पटलावर आपली वेगळी छाप सोडणारे डॉक्टर जितीन दादा वंजारे हे एक उत्कृष्ट समाजसेवक आहेत. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील बरेचसे युवक सामाजिक कार्यासाठी धजतात शैक्षणिक क्षेत्रातील कोणतीही अडचण असो विद्यार्थ्यांना ते नेहमीच मोलाच मार्गदर्शन करतात.खालापुरी गावचा विद्यार्थी शेख सोहेल याची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना डॉक्टर जितीन वंजारे खालापूरीकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यक्तीं कडून व समजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत जमवून त्याला ऑलम्पिक साठी जाण्यासाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन अनी सहकार्य ते नेहमीच करतं असतात. गावातील युवकांचा शैक्षणिक विकास होऊन त्यांनी आपल्या शेतकरी बापाचं स्वप्न पूर्ण करावं हाच एक उद्देश ठेवून सावकारी खाली दडलेल्या माणसाला एक सन्मानाचे जीवन देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे डॉक्टर जितीन वंजारे हे शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्ते शिक्षण, विद्युत, सिंचन, शेती विषयक मालाचे हमीभाव, महागाई,बेरोजगारी इत्यादी अनेक प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठूवून शासन दरबारी वेगवेगळे निवेदने आंदोलने करून आपलं सामाजिक कार्य निभावतात. ही त्यांची रास्त भावना लक्षात घेता त्यांना आज पर्यंत चार राज्यस्तरीय “समाजरत्न व समाजभुषण” पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे खालापूरीचा एक भूमिपुत्र म्हणून त्यांचा सत्कार खालापूरी या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रशिद मामू शेख यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ जितीन दादा वंजारे यांना भव्य नागरी सत्कार करन्यात आला. या आयोजित कार्यक्रमात रशीद शेख यांनी वरील उद्गार काढले यावेळी कार्यक्रमासाठी असंख्य गावकऱ्यांसह शिवसेना नेते रशिद मामू शेख,शिवसंग्राम युवा नेते कृष्णा परजणे, प्रगतशील शेतकरी विनायक परजने, राष्ट्रवादी युवा नेते बप्पासाहेब परजने, गणेश घोलप, सोहेल शेख, इसाक शेख,उद्धव काळे चंदू खरपाडे, केशव गवळी,हरी डोके इत्यादी सह अनेक गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close