ताज्या घडामोडी

रब्बी साठी पाणी पाळ्यांचे नियोजनच नाही;पालकमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली कालवा सल्लागार समितीची बैठक ही नाही-काॅम्रेड राजन क्षीरसागर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

एकीकडे जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणातून ८.६ टिएमसी पाणी सोडावे यावरून रणकंदन माजलेले असताना मराठवाड्यातील सर्वात जुन्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पात येलदरी-सिद्धेश्वर धरणात येलदरी ५७ टक्के आणि सिद्धेश्वर ९२ टक्के पाणीसाठा असताना देखील दुष्काळग्रस्त परिस्थितीत ५७ हजार हेक्टर लाभक्षेत्रात रब्बी पेरणीसाठी पाणी पाळ्या दिलेल्या नाहीत. रब्बी पिकांसाठी पाणी देण्याचे कोणतेही नियोजन करण्यात आलेली नाही.याचे मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीची बैठकच आजतागायत घेण्यात आलेली नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटनिस कॉ राजन क्षिरसागर यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे केला आहे.

या पुढे क्षिरसागर म्हणतात की,तीन जिल्ह्यात पसरलेला हा प्रकल्प असून परभणी, हिंगोली व नांदेड येथील पालकमंत्री मा अब्दुल सत्तार, मा गिरीश महाजन, मा रवींद्र बनसोडे यांनी बैठकीसाठी वेळ दिला नसल्याने पाण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. अशी धक्कादायक माहिती पाटबंधारे प्रशासनाने परभणी जिल्हाधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केल्याचे ते सांगतात. यावर किसान सभेचे काॅम्रेड राजन क्षीरसागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याची अवहेलना सत्ताधारी मंत्र्यांनी चालवलेली आहे. यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ परभणी येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. व तसेच पूर्णा पाटबंधारे प्रशासनाने दिनांक २५ नोव्हेंबर पासून तात्काळ पाण्याचे रोटेशन सुरू करावे असे आदेश दिले. याप्रसंगी मा आ विजय गव्हाणे खा फौजिया खान हे उपस्थित होते. रितेश काळे, निळकंठ जोगदंड, यासह अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. किसान सभेने पालकमंत्र्यांचा तीव्र धिक्कार केला असून शासन निर्णय पालकमंत्री स्वतःच मोडीत काढत असल्याचा आरोप केला आहे. यात पुढे ते म्हणाले पुतना मावशीचा रोल पालकमंत्री बजावत आहेत का.? असा संतप्त सवाल ही त्यांनी केला आहे.


पाथरी तालुक्यात हक्काच्या पाण्या साठी सर्व पक्षिय जायकवाडी पाणी संघर्ष समितीचे लवकरच गठन करून संघर्ष अधिक तिवृ होण्याचे संकेत खवने पिंप्रिचे सरपंच सुभाषराव चव्हाण यांनी दिले आहेत,पाथरी,सेलु.मानवत या तालुक्या सह जिल्ह्यातील लाभधारक शेतकरी,सामान्य आणि सर्व पक्षिय नेते पदाधिकारी या संघर्ष समितीच्या माध्यमातून जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळवण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. येत्या आठ दिवसात जायवाडी पाणी संघर्ष समितीच्या स्थापणेची बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close