भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पार पडले चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘नमो नवमतदाता’ संमेलन


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आभासी मार्गदर्शनाचे झाले सामुहिक दृकश्रवण
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने देशभरातील असंख्य नवमतदार तरूण-तरूणींशी ‘नमो नवमतदाता’ संमेलनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून दि.२५ जानेवारीला जाहीर संवाद साधला. यावेळी उपरोक्त संमेलन संवाद सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दुकश्रवण करण्यात आला होता.
नमो नवमतदाता संमेलन हे चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
हा संवाद राजुरा विधानसभा क्षेत्रात पाच ठिकाणी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, वरोरा विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी,तर चिमूर विधानसभा क्षेत्रात दोन ठिकाणी झाला . चंद्रपूर जिल्ह्यात एकंदर 15 ठिकाणी ह्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती नमो नवमतदाता जिल्हा संयोजक महेश देवकते यांनी या प्रतिनिधीशी बोलताना चंद्रपूर मुक्कामी दिली.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालये तथा भाजयुमोच्या माध्यमातून उत्कृष्ट व सुरेख बॅनर व फ्लॅक्स लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे “नमो प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी ठिक ठिकाणी भाजपाचे नेते, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, कार्यकर्ते यांनी उपस्थिती राहून मोलाचे मार्गदर्शन केले.चंद्रपूर जिल्ह्यातील नवमतदारांचा प्रतिसाद पाहून आपण भारावून गेलो अशी प्रतिक्रिया नमो नवमतदाताचे जिल्हा संयोजक महेश देवकते यांनी व्यक्त केली.