सहाय्यक अधिसेविका वंदना बरडेंना फ्लाॅरेंस नाईटिंगेल पुरस्कार बहाल

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आधुनिक परिचरिकांच्या अग्रगण्य जनक फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांच्या जन्म दिन प्रित्यर्थ चंद्रपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने स्थानिक कन्नमवार सभागृहात जिल्हा स्तरीय पुरस्कार समारंभाचे दि.२४मार्चला आयोजन करण्यात आले होते. अत्यंत थाटात पार पडलेल्या या पुरस्कार समारंभात चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधीसेविका वंदना विनोद बरडे यांना त्यांच्या विशेष व उल्लेखनीय कामगिरी बाबत सन २०२१-२०२२या वर्षातील फ्लाॅरेंस नाईटिंगेल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कार वितरण सोहळ्याला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विवेक जाॅनसन , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत या शिवाय जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ . महादेव चिंचोळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ . हेमचंद्र किन्नाके व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तदवतंच या समारंभात इतर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरी बद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.वंदना बरडे यांना फ्लाॅरेंस नाईटिंगेल हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.वंदना बरडे ह्या उपराजधानी नागपूरच्या मुळ रहीवाशी असून गेल्या तीन वर्षांपासून त्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे .या पूर्वी त्यांनी रामटेक , भंडारा,सिरोंचा, एटापल्ली व आष्टी येथील आरोग्य विभागात आपली प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे.दरम्यान वंदना बरडे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल भारती जैन ,आरती सावलकर , पल्लवी बावणे , वंदना सरोदे , सुलभा आगरकर, सुलभा बुलदेव , त्रिवेणी लव्हाळे ,कुमुद मस्की , कौशल्या बरडे ,रजनी काळमेघ,जिजा लोही ,मोनिका काटोके ,पुरुषोत्तम डाखोडे, माजी खासदार डॉ .पद्मश्री विकास महात्मे, डॉ.अंकुश राठोड, डॉ.लांबट , डॉ.मुंजनकर ,सरीता शेंडे , वनिता निघोट ,या शिवाय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.