ताज्या घडामोडी

शाळा व अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डा तातडीने बुजवावा; नगरसेविका शेख शिरीन फातेमा अब्दुल मलिक यांचे निवेदन

शाळा व अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डा तातडीने बुजवावा; नगरसेविका शेख शिरीन फातेमा अब्दुल मलिक यांचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी

भारतरत्न खान अब्दुल गफार खान विद्यालय तसेच अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगर परिषद पाथरीच्या नगरसेविका शेख शिरीन फातेमा अब्दुल मलिक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व वाहने ये-जा करतात. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, वेळेत दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांसोबत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नगरसेविका शेख शिरीन फातेमा अब्दुल मलिक यांनी निवेदनातून दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close