ताज्या घडामोडी

जनरल डायर गेला… पण मनोवृत्ती अजून जिवंत आहे!

-प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे

जनरल डायर ची आठवण पुन्हा एकदा आली. जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली की जनरल डायरचे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप निर्माण करते. जनरल डायर नी एकही गोळी चालविली नाही त्याने फक्त ऑर्डर दिला आणि आपल्याच भाऊबंदानी आपल्याच लोकांवर बेछूट गोळीबार केला. जनरल डायर च्या मनोवृत्तीचे लोकं आजही आपल्यात आहेत, अशेच काही लोकं संसदेत बसून ‘ऑर्डर’ देतात आणि आपलेच ‘पोलीस’ भाऊबंद आपल्या हतबल विद्यार्थांवर ‘लाठीचार्ज’ करुन त्यांना रक्तबंबाळ करतात. जनरल डायर च्या मनोवृत्तीचे लोकं हे भित्रे असतात, संसदेवर विद्यार्थांचा मोर्चा पाहून वेळीच मागच्या दाराने पळ काढतात. संसदेत विरोधी पक्ष्याच्या महीला घेराव घालतील या माहितीने संसदेत येण्याच टाळतात. आंदोलनाला गालबोट लावून बदनाम करावं म्हणून आधीच प्लानिंग करतात, दगडाने भरलेले मोठे ट्रक आंदोलनस्थळी दाखील केले जातात, पोलिसांकडून आधीच गाड्यांची काचे फोडून ठेवली जातात. परंतु हे आंदोलनकारी विद्यार्थी खूप हुशार! पहाटे चार वाजताच या ट्रक चे आणि गाड्यांची काचे फोडणाऱ्या पोलिसांचे व्हिडिओ बनवून सगळीकडे पाठवून देतात. यामुळे जनरल डायर ची मनोवृत्ती असणाऱ्या लोकांचे ‘मास्टरस्ट्रोक’ पुन्हा-पुन्हा एकदा फसतात. नावाचे बॅज नसलेले पोलीस, भाड्याने आणलेले गुंड, अतिउत्साही अंधभक्त गर्दीत घुसविल्या जातात, आणि आंदोलनाला हिंसक बनविण्याच काम यांना देण्यात येते, हे सगळ हजारो आंदोलनकर्त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्यामुळे पुन्हा एकदा जनरल डायर ची मनोवृत्ती असलेल्यांचा चा ‘मास्टरस्ट्रोक’ फसतो. मात्र सोशल मिडीयावर आपल्या अर्धवट ज्ञान असलेल्या भक्तांना आंदोलनाची बदनामी करण्याचं काम करण्यासाठी मोकळ सोडलं जाते. म्हणूनच जनरल डायर चा सत्कार झाला होता, कदाचित या वेळेस आणखी एक अवार्डही मिळेल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close