ताज्या घडामोडी

नेरी येथे”माझं गाव आरोग्य संपन्न गाव” शिबिर उत्साहात संपन्न

धनश्री पतसंस्था नेरीच्या वतीने क्षय रुग्णांना आहार किटचे वाटप

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चिमूर तालुक्यातील नेरी येथे 19 जून 2016 ला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी व ग्रामपंचायत नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” हे आरोग्य शिबिर ग्रामपंचायत सभागृह नेरी येथे संपन्न झाले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देऊन गावांना स्वयंपूर्ण आणि निरोगी बनवणे हा आहे. या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशिष्ट पारितोषिके मिळणार आहे.
सदर कार्यक्रमात आरोग्य विषयक सविस्तर माहिती व मार्गदर्शन नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज तेलमासरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेखा पिसे (सरपंच नेरी ग्रामपंचायत) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज तेलमासरे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी कामडी. नेरी ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी भाग्यवान शेंडे हे होते. सदर कार्यक्रमात धनश्री पतसंस्था नेरी तर्फे क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप डॉक्टर श्यामजी हटवादे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्राम विकास अधिकारी भाग्यवान शेंडे, सरपंच रेखाताई पिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तेलमासरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी कामडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मंगर , ग्रामपंचायत सदस्य पद्ममा नागदेवते, ग्रामपंचायत सदस्य नानाजी दडमल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व प्रतिनिधी
, धनश्री बँकेचे सदस्य डॉ. हटवादे , व्यवस्थापक पाकमोडे व बँकेच्या कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन तसेच उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close