ताज्या घडामोडी

डॉ अजय पिसे यांच्या “मॅजिक महुआ एनर्जी ड्रिंक” चे एग्रो-व्हिजन नागपूर मध्ये मा गडकरीजींच्या उपस्थितीत अनावरण

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

नागपूर येथील दादासाहेब बालपांडे औषधनिर्माण महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक डॉ. अजय घनश्यामजी पिसे व सहकार्यांनी संशोधित केलेल्या मोह्फुलांपासून अल्कोहोल विरहीत ‘म्याजीक महुआ’ नावाचे ‘एनर्जी ड्रिंक’ नागपूर येथे संपन्न झालेल्या एग्रो-विजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश चे कृषीमंत्री व अनेक मान्यवर उपस्थित होते.

मा. नितीनजी गडकरी यांनी मोहापासून तयार केलेल्या या संशोधनाची प्रशंसा केली व बाजारात उपलब्ध असलेल्या केमीकलयुक्त कोल्ड्रिंक पेक्षा मोहाचे ‘म्याजीक महुआ’ ‘एनर्जी ड्रिंक’ जास्त उपयुक्त होऊ शकते यामुळे याचा जास्त प्रसार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.

या प्रकल्पामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील आदिवासी व बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. मोहाच्या समाजोपयोगी संशोधनाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रकल्पाला संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज बालपांडे, प्राचार्य डॉ. उज्वला महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close