कृषीदिनी नागभीड तालुक्यात घनकचरा गाडी (ई रिक्षा) चे लोकार्पण

१५ वा वित्त आयोग जि. प. स्तर निधीतुन ग्रा.पं.ला गाडी प्राप्त
माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचा पुढाकार
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
कृषी दिनाचे औचित्य साधून जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने पंधरा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर यातुन प्राप्त घनकचरा गाडी ( ई रिक्षा ) चे नागभीड तालुक्यातील ग्राम पंचायत मिंथुर , कोर्धा , नवेगाव पांडव व कोथुळणा येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रांगणात विधिवत लोकार्पण करण्यात आले.
गाव हे स्वच्छ राहावे व आरोग्यदायी व्हावे या दृष्टीकोनातून गावातील कचरा बाहेर टाकल्या जावे यासाठी या ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे सदर घनकचरा गाडीची मागणी केली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत संजय गजपुरे यांनी पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तरातून ई रिक्षा मागणीचा पाठपुरावा चंद्रपुर जिल्हापरिषदेला सातत्याने केला.
या आर्थिक वर्षात प्राप्त १५ व्या वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर मधुन सदर मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मंजुर करण्यात आली . त्यानुसार नागभीड तालुक्यातील मिंथुर , कोर्धा , नवेगाव पांडव , कोथुळणा व नांदेड ग्राम पंचायत यांना कचरा गाडी प्रदान करण्यात आली. या पर्यावरण पुरक घनकचरा गाडीचे लोकार्पण कृषी दिनाचे तसेच गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते व चंद्रपुर – गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधीत ग्रामपंचायत कार्यालय मिंथुर येथे सरपंच नंदकिशोर करकाडे , कोर्धा येथे सरपंच सौ. पुष्पाताई चौधरी , नवेगाव पांडव येथे सरपंच सौ. ॲड. शर्मिलाताई रामटेके व कोथुळणा येथे सरपंच सौ. मंजुषाताई डाहारे यांच्या हस्ते विधिवत पुजन करुन लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची विशेष उपस्थिती होती. या कचरा गाडीचा वापर करीत गावकऱ्यांनी आपल्या घरातील कचरा इतरत्र न टाकतां या गाडीतच टाकावा असे आवाहन संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले . यावेळी कृऊबास संचालक धनराजजी ढोक , भाजपा नागभीड तालुका महामंत्री सुनिल शिवणकर , ज्येष्ठ नेते वासुदेवजी जिवतोडे , विजय खोब्रागडे , फकीरा मेश्राम , बंडुभाऊ मेश्राम , उपसरपंच दिनेश चौधरी , सेवा सोसायटी अध्यक्ष संतोषजी पिसे , ग्रा. पं.सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष , शक्ती केंद्र प्रमुख , बुथ प्रमुख व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते . ग्रामपंचायतीला घनकचरा ई रिक्शागाडी दिल्याबद्दल मिंथुर , कोर्धा , नवेगाव पांडव व कोथुळणा येथील ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामस्थांनी संजय गजपुरे व जिल्हापरिषद प्रशासनाचे आभार मानले आहे.