रेती तुटवड्याचा प्रश्न सोडवा -सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची जिल्हाधिका-यां कडे मागणी

रेती तुटवड्याचा प्रश्न सोडवा -सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची जिल्हाधिका-यां कडे मागणी
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
घरकाम बांधकाम करणाऱ्या लोकांना रेती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.दरम्यान दि.३१-९-२०२३ पासून रेती घाट बंद असल्यामुळे खाजगी बांधकाम, मिस्त्री, कामगार ,ट्राॅली, ट्रॅक्टर,मालक मजूर , खोदकाम कामगार,पेंटर , आदिंवर रेती तुटवड्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. तद्वतच त्यांना दोन वेळच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.एव्हढेच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों घरकुल बांधकाम धारकांना सुध्दा रेती मिळत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.तर मूल शहरात नगर परिषदेने खाजगी बांधकाम धारकांना परवानगी दिल्या नंतरही त्यांना रेती उपलब्ध होत नाही.ही वस्तूस्थिती आहे.या संदर्भात नुकतीच सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय एस . समर्थ व काही पदाधिकारी बांधवांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एक लेखी निवेदन सादर केले.आपल्या नियमात बसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाट लवकर सुरू करावे किंवा शासनाने बांधकाम करणाऱ्यांना परवानगी दिली असेल त्यांना तातडीने रेती परवाना उपलब्ध करून देण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.