ताज्या घडामोडी

श्रीराम’ प्राणप्रतिष्ठा निमित्त परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर येथे उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अयोध्या येथील प्रभू रामचंद्राचे मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त प.पू.श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे कार्यकारी अधिकारी अॅड. श्री मुकुंदराव चौधरी यांनी दिली. सदर कार्यक्रमाविषयी बोलताना चौधरी म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त देशभरात सर्वत्र उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण राहणार असून त्यानिमित्त साई मंदिरातही उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त नेहमीप्रमाणे मंदिर व मंदिर परिसराची विशेष साफ सफाई करून घेण्यात येणार आहे. मंदिर, द्वारकामाई मंदिर, ध्यानमंदिर याठिकाणी समया, पणत्या लाऊन दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. मंदिरात दिवसभर गीतरामायण, रामरक्षा, रामनामाचा जप व हनुमान चालीसा चालू ठेवली जाणार आहे. सकाळी ८:०० वाजता समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. श्री अतुलराव चौधरी यांचे हस्ते ‘प्रभू श्रीरामचंद्र परिवारस’ महाभिषेक करण्यात येणार आहे. मंदिराच्या शिखरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दुपारी साईबाबांच्या महाआरतीनंतर भक्तांना खिचडी व लापशीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, मंदिर शिखरावर गुढी उभारण्यात येणार आहे तसेच नवीन निशाण/ध्वज लावण्यात येणार आहे. तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेत, श्री ह भ प योगेश महाराज गायके, तीर्थपुरी यांचे श्रीराम जन्म विशेष सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास समितीच्या वतीने अॅड. श्री मुकुंदराव चौधरी यांनी आवाहन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close