माजलगांवच्या स्वप्नील धाईजे ची यूकेत भरारी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव तालुक्यातील केसापूरी कैम्प येथील रहिवासी असलेले व सध्या पाथरी येथील शासकिय रुग्णालयात कार्यरत असलेले विक्रम धाईजे यांचा मूलगा स्वप्नील धाईजे याचा युनायटेड किंगडम इंग्लंड येथील टिसाईड यूनिव्हरसिटी मध्ये नंबर लागला असून आवश्यक असलेल्या सर्व परिक्षेत यश संपादित करून त्याने प्रवेश मिळवला आहे .
स्वप्नील धाईजे चे पहिली ते दहावी पर्यंत चे शिक्षण जवाहर विद्यालय केसापूरी कैम्प माजलगांव येथे मराठी मिडीयम मध्ये झाले . स्वप्नीलने दहावीत असतांनाच ठरवलं होत त्या मागचं कारण म्हणजे विडीवो गेमिंग अन् व्हॉलीवूड सिनेमातले ह्युजुअल इफेक्ट सिन याने तो प्रभावीत झाला होता . बारावी झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे बीएससी पूर्ण केले ए प्लस ग्रेड ही मिळवला नंतर इंटर्नशिप व जॉब चा अनुभव घेतल्यावर यूके ला जायचे ठरवलं व त्या साठी आवश्यक असलेल्या सर्व परिक्षा पास करत युनायटेड किंगडम इंग्लंड येथे प्रवेश मिळवला आहे त्याच्या या शैक्षणिक संघर्षात आई वडीलांनी मोठी साथ दिली असून त्याचं सर्वत्र कौतूक होत असून पूढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.