चिमूर तालुक्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवा

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
महिलांना एकत्रित करून मायक्रो फायनान्स च्या विरोधात तक्रारी दाखल करू- जावेद पठाण रा.का.अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष
दररोज शेकडो महिलांना एकत्र करून नियमाची पायमल्ली
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन लावले असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून शेकडो महिलांना एकत्र करून या कंपन्या कर्ज वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली कोरोना काळापुरती थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी चे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जावेद पठाण , यांनी केली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश असतानाही चिमूर तालुक्यात सर्रासपणे मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी दर दिवसाला सोमवार किव्हा आठवडी बाजाराच्या दिवशी चिमूर तालुक्या मध्ये ठराविक नेमणूक केलेल्या महिलांच्या घरी शेकडो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांद्वारे कामगारांना तसेच महिला बचत गट सदस्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आमिष दाखवून कर्ज वितरण केले आहे; मात्र, ‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर या महिलांमध्ये कर्ज हप्ते भरण्याइतकी आर्थिक कुवत राहिलेली नाही. या कामगारांना व महिलांच्या हाताला काम नसल्याने वेतन मिळत नाही, अशा परिस्थितीत खासगी तसेच मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते ते भरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. वरून
हे मायक्रो फायनान्स वाले तुम्ही कर्ज भरला नाही तर दुपट्ट पटीने जास्त प्रमाणात पैसे घेऊ असल्या धमक्या देत असून त्यानी नेमणूक केलेल्या काही महिला कर्ज घेणाऱ्या महिलांना तुमच्या घरातील सामान उचलून नेऊ नाही तर तुमी कर्ज भरा असल्या प्रकारच्या धमक्या फोन वर किंव्हा घरी जाऊन देत असतात कोरोना महामारी मध्ये लोकांन कडे काम पैसा नसून सर्व काम धंदे व दुकाने बंद असल्याने आपल्या व आपल्या परिवाराचा उधर निर्वाह करण्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असून व कोरोना महामारी मध्ये चिमूर तालुक्यातील मायक्रो फायनान्स चे प्रतिनिधी सक्तीच्या वसुल्या करत लोकाना त्रास देत आहे असल्या प्रकारच्या सक्तीच्या वसुल्या थांबवा अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते चिमूर तालुक्यातील महिलांना घेऊन तक्रारी दाखल करतील. असा ईशारा रा. का अल्प. तालुका अध्यक्ष जावेद पठाण यांनी दिला आहे.