शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंध- अपंग यांना राशन किट वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 12 / 12 / 2021 वार रविवारी दुपारी 04 वाजता पोलीस मित्र परिवार समन्वय. समितीचे संस्थापक अध्यक्ष मा डॉ संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अंध – अपंग अशोक तांगडे पत्नी सुमित्रा तांगडे, व शेख रोशन यांना शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून राशन किट देण्यात आले या वेळी पोलिस मिञ परीवार समन्वय समितीचे प्रदेश संघटक अहमद अन्सारी महेश जोशी रईस कुरेशी हमिद अत्तार पत्रकार आणि पाथरीचे महान समाज सेवक अहमद अन्सारी यांच्या अनमोल मदतीने कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शोभा आली सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अहमद अन्सारी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात पत्रकार , समाज सेवक आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश जोशी , रईस कुरेशी , उपस्थित होते सर्वांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाले.